Rangkarmi
Rangkarmi 
नागपूर

लॉकडाउनमध्ये काय करत आहेत रंगकर्मी, जाणून घ्या... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संचारबंदीने सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनाही घरात बसवले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे कुटुंबीयांसमवेत "टिकटॉक' तयार करीत आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते मधू जोशी वेळेचा सदुपयोग म्हणून "गीतारहस्य' वाचत आहेत. विशेष म्हणजे, नुकतेच त्यांनी 85व्या वर्षात पदार्पण केले आहे. वृद्धापकाळात गीतारहस्य वाचल्याने ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रशासनाच्या सूचनांचे घरातच राहून पालन करण्याला सध्या सर्वच ज्येष्ठ रंगकर्मी प्राधान्य देत आहेत. प्रसिद्ध अभिनेते राजेश चिटणीस यांनी काही ज्येष्ठ कलावंतांसोबत एक व्हिडिओ ग्रुप तयार केला आहे. ज्यात संजय भाकरे, नरेंद्र शिंदे, देवेंद्र दोडके, देवेंद्र लुटे, देवेंद्र बेलकर, नरेश गडेकर, विनोद काळे, विनोद देशपांडे व मुंबईचे वीरेंद्र लटणकर यांचा समावेश आहे. नाट्यविश्‍वातील घडामोडींवरील विषयावर ग्रुपमध्ये चर्चा होते.

विशेष म्हणजे, ग्रुपमधल्या एकाला त्या दिवशीचा अध्यक्ष बनविण्यात येते. विशेष म्हणजे, या ग्रुपमध्ये आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे नाट्यदिग्दर्शक संजय भाकरे यांनी सांगितले. नाट्यवाचन, मुंबईचे व नागपूरचे नाटक, व्यावसायिक रंगभूमी, नागपुरातले उत्कृष्ट तीन दिग्दर्शक आणि उत्तम नट कोण, वर्तमान मराठी रंगभूमी, नव्वदपूर्वीची आणि नंतरची रंगभूमी अशा विषयांवर चर्चा झाल्याचे भाकरे यांनी सांगितले. 

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, वाचन व लेखनात वेळ घालवत आहे. नियमित व्यायाम व योग केल्यानंतर नाश्‍ता करतो. घरातील ज्या कोपऱ्यात कधी डोकावलो नव्हतो, त्या भागात स्वच्छता करतो आहे. गाणे ऐकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारतो. तर ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर म्हणाले की, पन्नास वर्षांहून अधिकचा काळ रंगभूमीच्या सेवेत घालवला. या काळातील चांगल्या अन्‌ वाईट अनुभवांची नोंद करीत आहे.

बारा परीक्षांची तयारी करतोय

नाट्यदिग्दर्शक व अभिनेते डॉ. पराग घोंगे यांना विद्यापीठाच्या बारा परीक्षा द्यायच्या आहेत. सध्या ते सहा सत्रांच्या सहा थेअरीच्या आणि सहा प्रॅक्‍टिकलच्या पेपर्सची तयारी करीत आहेत. शिवाय तबलागुरू विवेकजी यांच्यासोबत एमएफएच्या नोट्‌स तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित वेळ घरकामात घालवत असल्याचे डॉ. घोंगे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT